मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात.
या कार्यक्रमाचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे होणार आहेत.
या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एक आठवडा वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. आमिर खान, डी. पी. सिंह, मिताली मधुमिता, एम. सी. मेरी कॉम आणि सुनील छेत्री हे मान्यवर या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत.
‘कौन बनेगा करोडपती-१४’ च्या आगामी एपिसोडचा प्रोमो व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, सुनील छेत्री आणि मेरी कॉम हे अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजेशीर गप्पा मारत आहेत.