24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनजॅकलीन फर्नांडिसला समन्स

जॅकलीन फर्नांडिसला समन्स

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पटियाला हाउस कोर्टाने २०० कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला समन्स बजावले आहे. समन्समध्ये जॅकलीनला २६ सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे.

या प्रकरणात नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतली आहे. या प्रकरणाचा संबंध महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी आहे. अंमलबजावणी संचालनालयाने जॅकलिनला या प्रकरणी आरोपी केले आहे.

जॅकलिन फर्नांडिसने काही दिवसांपूर्वी ईडीला एफडी स्वत:च्या पैशातून तयार केल्याचे सांगितले होते. जॅकलिन फर्नांडिसला पुढील महिन्यात २६ तारखेला हजर राहण्याचे निर्देश दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या