22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमनोरंजन‘टाईमपास ३’ ची यशस्वी घोडदौड; ४ दिवसांत ४.३६ करोडची कमाई

‘टाईमपास ३’ ची यशस्वी घोडदौड; ४ दिवसांत ४.३६ करोडची कमाई

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अवघ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे दगडू आणि प्राजू. प्रेक्षकांनी ‘टाइमपास १’ आणि ‘टाइमपास २’ मधील दगडू आणि प्राजूच्या अनेख्या लव्हस्टोरीला प्रचंड उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर आता नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘टाइमपास ३’ नेही प्रेक्षकांची मने जिकंली आहेत.

रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने रंगलेल्या ‘टाईमपास ३’ ने बॉक्स ऑफिसवर अवघ्या ४ दिवसांमध्ये ४.३६ करोडची कमाई करून फुल्ल धुमाकूळ घातला आहे. अजूनही बॉक्स ऑफिसवर ‘टाइमपास ३’ची यशस्वी घोडदौड सुरु आहे. सध्या पालवीची डॅशिंग, लव्हेबल अदा, दगडूची जबरदस्त कॉमेडी आणि त्यात भर म्हणून दगडूची गँग प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी चित्रपटाविषयी म्हणतात, अवघ्या ४ दिवसांमध्ये ४.३६ करोडची कमाई करून बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या