मुंबई : झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिकेचे शीर्षक गीत प्रेक्षकांना फार आवडले आहे. मालिकेत आणखी एक गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गाण्याचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले. कलाकारांचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
‘तू तेव्हा तशी’ मालिकेत अनामिका आणि सौरभ यांचं प्रेम हळूहळू छान बहरत आहे. वल्ली मात्र पट्या आणि अनूच्या प्रेमात खडा घालण्याची एकही संधी सोडत नाही. हीच वल्ली आणि अनामिका आता आमनेसामने येणार असून दोघींवर एक धम्माल गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
गाण्याचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले असून गाण्याचे व्हीडीओ आणि फोटो देखील समोर आले आहेत. ‘धिंगाणा वाली फॅमिली’, असे म्हणत कलाकारांनी गाण्याच्या शूटिंगचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पट्या आणि अनूची फॅमिली एकमेकांबरोबर तूफान मज्जा करताना दिसत आहेत.
अनामिका आणि वल्लीने नऊवारी साडीत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. नऊवारी साडीतील अनामिका आणि वल्लीचा वेगळाच थाट पाहायला मिळतोय. दोघीही फार सुंदर दिसत आहेत. गाण्यासाठी सगळेच कलाकार मराठमोळ्या वेशात तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेच्या या नव्या गाण्यात वल्ली आणि अनू एकमेकींना चांगलाच धडा शिकवताना दिसणार आहेत असे म्हणायला हरकत नाही.
मालिकेच्या या नव्या गाण्यात वल्ली आणि अनू एकमेकींना चांगलाच धडा शिकवताना दिसणार आहेत असे म्हणायला हरकत नाही. या धिंगाणा फॅमिलीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून प्रेक्षकही कलाकारांना छान नटलेले पाहून कौतुक करत आहेत.