22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनप्रियंकाने दम्यामुळे केली नाकाची शस्त्रक्रिया

प्रियंकाने दम्यामुळे केली नाकाची शस्त्रक्रिया

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रियांका चोप्राचे ‘अनफिनिश्ड’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात प्रियांकाने आयुष्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. मित्राच्या सांगण्यावरून डॉक्टरांकडे गेली. तेव्हा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी नाकातील पॉलिप काढताना ब्रिजलाही धक्का लावला. त्यामुळे नाकाचा आकार पूर्णपणे बिघडला होता, असे पुस्तकात प्रियांका चोप्रा म्हणते.

शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी नाकावरील पट्टी काढली तेव्हा माझा चेहरा पूर्णपणे वेगळा दिसत होता. प्रत्येकवेळी स्वत:ला आरशात बघितल्यावर चेहरा ओळखू शकत नव्हते. याचा व्यावसायिक जीवनावर वाईट परिणाम झाला. आधीची शस्त्रक्रिया बिघडल्यानंतर मला नाक ठीक करण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली, असेही प्रियांकाने सांगितले.

प्रियांका चोप्राने नाकाची शस्त्रक्रिया आपले सौंदर्य वाढवण्यासाठी नव्हे तर दम्यामुळे केली होती. मात्र, याचा तिला अधिकचा त्रास सहन करावा लागला. तिचा चेहरा पूर्णपणे बिघडला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या