मुंबई : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक शरद गोरे यांच्या ‘फुल टू हंगामा’ या मराठी चित्रपटाद्वारे सुप्रसिद्ध मॉडेल, मिसेस एशिया पॅसिफिक व मिसेस इंडिया विजेती डॉ. रम्यता प्रफुल्ल (जमशेदपूर, झारखंड) मराठी चित्रपटात प्रथम पदार्पण करीत आहे.
शरद गोरे, डॉ.रम्यता, प्रीतम अडसूळ, सौरव चिरमुला यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘फुल टू हंगामा’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते नुकताच झाला. डॉ. रम्यता हा नवीन चेहरा मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार आहे. रमाकांत सुतार, प्रकाश धिंडले, सुनील साबळे, अमोल कुंभार, शुभांगी देवकुळे आदी कलाकारही या चित्रपटात अभिनय करीत आहेत. रवींद्र लोकरे हे छायांकन करीत आहेत. सध्या माढा, करमाळा परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.