27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमनोरंजन‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये आर्यन खान दिसणार

‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये आर्यन खान दिसणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. लेकीनंतर शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.

आर्यन खानच्या डेब्यूबाबत एक वृत्त समोर आले आहे. आर्यन खान चित्रपटामध्ये कधी झळकणार याची माहिती शाहरूख किंवा आर्यनने अद्याप दिलेली नाही. मात्र या दोघांच्या चाहत्यांनी एक फोटो शेअर करत सर्वांनाच आनंदी केले आहे. हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. काही वेळापूर्वी सोशल मीडियावर आर्यन खानचा एक फोटो शेअर करत तो ‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर आर्यन खानचा एक फोटो शेअर करत तो ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या फोटोमध्ये आर्यन खान वानरास्त्रच्या रूपात दिसून येत आहे. हा फोटो समोर येताच चर्चेचा विषय ठरला आहे. आर्यन खानचा हा फोटो एका फॅन पेजने तयार केलेला असला तरी, तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. शाहरूख खाननंतर आता लोक आर्यन खानला चित्रपटांमध्ये पाहण्याची प्रतीक्षा करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या