23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमनोरंजनमी सध्या लग्न करण्यास तयार नाही 

मी सध्या लग्न करण्यास तयार नाही 

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे, त्यामुळे लग्नाचा विचार अजून करणार नाही, असे म्हणत मलायका अरोरा सोबत लग्नाविषयी अर्जुन कपूर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला आहे.

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण ७’ शो सध्या खूपच चर्चेत आला आहे. या शोमध्ये जिथे एका बाजूला सेलिब्रिटींच्या आयुष्यातील मोठे खुलासे आपल्याला हैराण करून सोडत आहेत तिथे दुसरीकडे या सेलिब्रिटींचे चाहते त्यांच्याशी संबंधित गॉसिप्सवर नजर ठेवून आहेत.

नुकतेच या शोमध्ये अभिनेता अर्जुन कपूरने आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. जे ऐकण्यासाठी अर्जुनचे चाहते मात्र भलतेच उत्सुक आहेत. आता आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की अर्जुन कपूर मलायका अरोराला डेट करत आहे,अर्थात त्यांच्यातील नातं नेहमीच चर्चेत राहिलं आहे. करणच्या शोमध्ये अर्जुनने अभिनेत्रीशी संबंधित काही प्रश्नांवर थेट उत्तरं दिली आहेत.

लग्नासंदर्भात अर्जुन कपूरच्या या उत्तरावर त्याचे चाहते मात्र काही खास खुश दिसत नाहीत. करण जोहरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुन कपूर म्हणाला की, ‘‘मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच मला माझ्या आयुष्यात स्थिर व्हायचे आहे, व्यावसायिक पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवरही. मला आयुष्यात काम करत राहायचं आहे, कारण त्यामुळे मला आंतरिक आनंद मिळेल आणि मी माझ्या जोडीदाराला पण खुश ठेवू शकेन.’’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या