25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमनोरंजन‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा टीझर आऊट

‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा टीझर आऊट

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा आगामी सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ असे या सिनेमाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या सिनेमात अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे. नेटफ्लिक्सने सोमवारी ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या सिनेमाची घोषणा केली होती. त्यामुळे राजकुमारचे चाहते या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. टीझरमध्ये राजकुमार राव आणि आकांक्षा रंजन कपूर दिसून येत आहे. राजकुमार आकांक्षाला म्हणतोय, मी मुळचा अंगोला या छोट्या खेड्यातला रहिवासी आहे.

‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या सिनेमात राजकुमार रावसह सिकंदर खेर, हुमा कुरैशी, राधिका आपटे आणि आकांक्षा रंजन कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. अद्याप निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केलेली नाही. राजकुमार राव या सिनेमात ंिप्रस ऑफ अंगोलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

कोरोनामुळे अनेक निर्माते त्यांचे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करत आहेत. अशातच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने नऊ सिनेमांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सिनेप्रेमींचा प्रत्येक दिवस फिल्मी होणार आहे. यात ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या सिनेमासह द आर्चीज, प्लॅन ए प्लॅन बी, चोर निकल के भागा, खुफिया, कटहल, चकदा एक्सप्रेस, कला या सिनेमांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या