मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रणबीर हा त्याच्या ‘शमशेरा’ नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निघाला असताना त्याच्या गाडीला अपघात झाला.
२२ जुलैला त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित शमशेरा या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्याच्या फर्स्ट लूक आणि टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
रणबीर कपूरने आपल्या अपघाताची माहिती देताना म्हटले आहे की, मला आज शमशेराच्या ट्रेलर लॉचिंगसाठी जायचे होते. मी माझ्यावेळेत त्या मॉलसमोर थांबलो होतो. अचानक एका कारने माझ्या कारला धडक दिली. त्यात माझ्या कारची काच फुटली आहे. माझे सुदैव की मला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.
मात्र त्या अपघाताने मी चांगलाच घाबरुन गेलो आहे. त्यानंतर आम्ही तातडीने शमशेराच्या ट्रेलरच्या कार्यक्रमाला मार्गस्थ झालो. मी संजय दत्त यांचा चाहता आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी देखील खास आहे. आजचा दिवस माझ्यासाठी मोठा आहे. शेवटी बहुप्रतिक्षेत अशा शमशेराचा ट्रेलर प्रदर्शित होतो आहे याचा आनंद आहे.