26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमनोरंजन‘लाल सिंग चड्ढा’ देशात फ्लॉप तर परदेशात हिट

‘लाल सिंग चड्ढा’ देशात फ्लॉप तर परदेशात हिट

एकमत ऑनलाईन

मुंबई : आमिर खानचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट कमाईच्या बाबतीत देशात जरी फ्लॉप ठरला असला तरी परदेशात या चित्रपटाने कमाईचा विक्रम मोडला आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२२ या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय कमाईच्या बाबतीत आमिरच्या या चित्रपटाने आलियाच्या ‘गंगुबाई काठियावाडी’, कार्तिक आर्यनच्या ‘भुलभुलैय्या २’ आणि विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ला मागे टाकलंय. जवळपास आठवडाभरात ‘लाल सिंग चड्ढा’ने ७.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास ५९ कोटींचा गल्ला जमवला आहे.

भारताबाहेरील कमाई-
लाल सिंग चड्ढा- ७.५ दशलक्ष डॉलर्स
गंगुबाई काठियावाडी- ७.४७ दशलक्ष डॉलर्स
भुलभुलैय्या २- ५.८८ दशलक्ष डॉलर्स
द काश्मीर फाईल्स- ५.७ दशलक्ष डॉलर्स

गंगुबाई काठियावाडी, भुलभुलैय्या २ आणि द काश्मीर फाईल्स हे तिन्ही चित्रपट देशभरात गाजले होते. १८० कोटी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटातून आमिरने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलेय. ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असून मराठमोळ्या अतुल कुलकर्णीने या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ची जगभरातील कमाई सध्या १२६ कोटी रुपये इतकी झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या