26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनविकी माझ्या रडारवर कधीच नव्हता

विकी माझ्या रडारवर कधीच नव्हता

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफने नुकतीच ‘कॉफी विथ करण १०’ च्या एपिसोडमध्ये हजेरी लावली. कतरिनासोबत इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी होते. हा एपिसोड येत्या गुरुवारी डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. विकी कौशल कधीच माझ्या ‘रडार’वर नव्हता, असे ती या शोमध्ये म्हणाली.

पुढे बोलताना कतरिना म्हणाली, मला विकीबद्दल फार काही माहीत नव्हते. त्याचे नाव मी ऐकले होते पण काम करण्याची संधी कधी मिळाली नव्हती. पण जेव्हा मी त्याला भेटले, तेव्हा त्याने माझे मन जिंकले. विकीसोबतचे नाते अनपेक्षित असून हे माझ्या नशिबात लिहिले होते आणि हे घडणारच होते. आम्हा दोघांमध्ये इतके योगायोग जुळून आले की एके क्षणी मला हे सर्व एखाद्या स्वप्नासारखेच वाटत होते, असे कतरिनाने म्हटले आहे.

कतरिना लवकरच ‘फोन भूत’ या हॉरर कॉमेडीमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत झळकणार आहे. हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘मेरी ख्रिसमस’, सलमान खानसोबत तिचा ‘टायगर ३’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या