मुंबई : शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने वादंग उठले आहे. अनेक ठिकाणी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होताना दिसतेय. दरम्यान बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी पठाण चित्रपटावर सडकून टीका केली होती. पण आता त्यांच्यावरच टीका होताना दिसत आहे.
अलीकडेच विवेक अग्निहोत्रींनी ट्विटरवर एकव्हीडीओ शेअर करत हा ‘व्हीडीओ बॉलिवूडविरोधातील आहे, तुम्ही सेक्युलर असाल तर पाहू नका,’असे ट्वीट केले होते. पण आता ही टीका त्यांच्यावर उलटताना दिसतेय. सोशल मीडियावर नेटक-यांनी त्यांच्या मुलीचे भगव्या बिकिनीतील फोटो व्हायरल केले आहेत.
काही लोकांनी विवेक यांची मुलगी मल्लिका अग्निहोत्री हिचे भगव्या रंगातील बिकिनीचे फोटो शेअर करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर ही मुलगी विवेक अग्निहोत्री यांचीच मुलगी असल्याचा काही लोक दावा करत आहेत आणि फोटो शेअर करत आहेत.
मल्लिकाचे सोशल मीडिया अकाऊंट प्रायव्हेट असले तरी तिला पल्लवी जोशी फॉलो करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे फोटो विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचेच असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा फोटो पाहून नेटक-यांनी अग्निहोत्रींना सुनावले आहे. ‘आधी स्वत:च्या घरात लक्ष द्या…’ असा सल्लाही नेटक-यांनी अग्निहोत्रींना दिला आहे.