मुंबई : रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाची मोठी चर्चा होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल अशी अपेक्षा देखील होती. मात्र, हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. ‘शमशेरा’कडून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरीची अपेक्षा या चित्रपटाशी संबंधित चाहते आणि स्टार्सना होती. ‘शमशेरा’ची कमाई आठवडाभरात खूपच कमी राहिली आहे.
‘शमशेरा’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली. या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन १०.२५ कोटी रुपये होते. चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये ३१ कोटी रुपयांची कमाई केली.
‘शमशेरा’ने सहाव्या दिवशी २.३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३९.७५ कोटींवर पोहोचले आहे. हे आकडे अतिशय निराशाजनक आहेत. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस ‘शमशेरा’ ची कमाई ४० कोटी रुपये होईल, असा विश्वास आहे.
अजूनही ‘शमशेरा’ची ६५-७५ कोटी रुपयांपर्यंत कमाई जाण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, ४० कोटींचा आकडा पार करणे देखील चित्रपटाला अवघड झाले आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी मोठे बजेट होते. हा चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल १५० कोटी खर्च करण्यात आले आहेत.