26.6 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeमनोरंजनशम्मी कपूर यांना करायचे होते मुमताजशी लग्न

शम्मी कपूर यांना करायचे होते मुमताजशी लग्न

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुमताज यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर वेगळी छाप सोडली. त्या काळात अनेक बॉलिवूड कलाकार मुमताज यांच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत होते. अशा अभिनेत्यांपैकी एक म्हणजे शम्मी कपूर, ज्यांचे मन मुमताजवर जडले. केवळ एका अटीमुळे दोघांचे नाते तुटले ही आणखी एक बाब आहे.

मीडिया रिपोर्टस्नुसार, मुमताज आणि शम्मी कपूर एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात होते. त्यावेळी मुमताज त्यांच्या करिअरच्या शिखरावर होत्या. एकत्र काम करताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही वर्षांच्या नात्यानंतर जेव्हा शम्मी कपूर यांनी तिला लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा त्यांनी नकार दिला आणि नंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

अलीकडेच जेव्हा मुमताज इंडियन आयडॉल १३ मध्ये आल्या तेव्हा त्यांना शम्मी कपूरची आठवण झाली.
त्या म्हणाल्या, त्याने मला सरळ सांगितले की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी १७ वर्षांची होते. मला लग्न करायचे नव्हते म्हणून लग्न केले नाही. मात्र, त्यानंतर दोघेही काही काळ रिलेशनशिपमध्ये आले. दुसरीकडे, मुमताज यांनी २०२० मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, शम्मीजींना घरातील सुनांनी चित्रपटात काम करावे हे आवडत नव्हते.

एवढेच नाही तर शम्मी कपूरने सांगितले होते की, जर तिला त्यांच्यासोबत आनंदी राहायचे असेल तर तिला तिचे करिअर सोडावे लागेल. त्यावेळी मुमताज त्यांच्या करिअरच्या शिखरावर होत्या आणि त्यांना हे मान्य नव्हते. अशा स्थितीत शम्मी कपूरसोबत ब्रेकअप करणेच त्यांना बरे वाटले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या