23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमनोरंजनसुश्मिता सेनच्या भावाची घटस्फोटातून माघार

सुश्मिता सेनच्या भावाची घटस्फोटातून माघार

एकमत ऑनलाईन

कोलकत्ता : सुश्मिता सेनचा भाऊ राजीव आणि वहिनी चारु यांच्या नात्यात लग्नानंतर काही दिवसांत गोष्टी बिघडू लागल्या होत्या. परंतु राजीवने आता घटस्फोट प्रकरणातून माघार घेतली असून दोघांमध्ये पॅचअप झाल्याचे म्हटले जात आहे.

राजीव आणि चारुने मीडियासमोर एकमेकांवर बरेच आरोप-प्रत्यारोप करायचे आणि मग लगेच त्यांच्यात सगळे आलबेलही होतंय अशा बातम्या पसरू लागायच्या. मात्र यावेळी गोष्ट थेट घटस्फोटापर्यंत पोहोचली होती. चारु म्हणाली होती की, आपली मुलगी जियानाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला पती राजीवपासून वेगळे व्हायचे आहे.

तिने राजीवला खूप वेळा संधी दिली आहे. तर राजीवने चारुवर व्हिक्टिम कार्ड खेळल्याचा आरोप करत, तिने तिचे पहिले लग्न लपवल्याचे देखील म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या