16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमनोरंजनसोनू सूदची लोकल वारी

सोनू सूदची लोकल वारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडमध्ये सोनू सूद ही अशी व्यक्ती आहे की त्याचे कौतुक जितके करावे तितके कमी आहे. त्याने चक्क आलिशान गाडी सोडून लोकल ट्रेनने प्रवास करत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. कोरोना महामारीच्या काळात त्याने लोकांना जी मदत केली होती ते अद्यापही कोणी विसरू शकले नाही.

दरम्यान सोनू अशा अभिनेत्यांपैकी एक आहे की पब्लिक त्याला तर रिअल लाईफचा हिरो मानतात. नुकताच त्याने सोशल मीडियावर स्वत:चा एक व्हीडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये करोडोंची कमाई असूनही अजूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत हे दिसून येते.

सोनूने त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हीडीओ पोस्ट केला आहे. या व्हीडीओमध्ये तो मुंबईची लाईफ म्हणजेच लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे. सोनू ट्रेनमध्ये बसला आहे आणि खिडकीबाहेर पाहत आहे. यादरम्यान सोनू खोल विचारात दिसतो आहे. या व्हीडीओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जीवन एक प्रवास आहे… छान प्रवास करा.’
हा व्हीडीओ समोर आल्यानंतर चाहते सोनूच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या