24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमनोरंजनहुमाने गायिले कपिलसाठी गाणे

हुमाने गायिले कपिलसाठी गाणे

एकमत ऑनलाईन

मुंबई : सोनी वाहिनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा लेटेस्ट प्रोमो व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओमध्ये कुरेशी हिरव्या रंगाच्या आऊटफिटमध्ये मंचावर दमदार एन्ट्री करते. तर कपिल शर्मा तिचे स्वागत करण्यासाठी हम्मा-हम्मा हे गाणे गातो. हुमा कुरेशी देखील गाण्यावर थिरकताना दिसली. यानंतर हुमा कपिलला त्याच्यासाठी गाणं गाण्याची इच्छा बाळगते.

हे ऐकून कपिलचा आनंद गगनात मावत नाही. तेव्हा हुमा कपिलसाठी ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’ गाणं गाते. हुमाचे गाणे ऐकून कपिलची बोलती बंद होते आणि चेह-यावरचा रंग उडून जातो. मग हुमा कपिलला राखी बांधण्याचा प्रयत्न करते. ज्यावर अभिनेत्याची रिअ‍ॅक्शन फारच मजेशीर असते. हुमाच्या या अंदाजवर शोमध्ये बसलेले प्रेक्षक हसून हसून बेजार होतात. कपिलची अवस्था पाहून असे वाटते की, यापुढे तो शोमध्ये आलेल्या अभिनेत्रींसोबत फ्लर्ट करणार नाही.

‘द कपिल शर्मा शो’ १० सप्टेंबरपासून शनिवार ते रविवार प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यावेळी शोमध्ये नव्या कॉमेडी कलाकारांचा सहभाग आहे. कपिलची पहिली टीम ‘कॉमेडी धुरंधर’ने शो सोडला आहे. कृष्णा अभिषेक, भारती सिंग, चंदन प्रभाकरसह अनेक कॉमेडी कलाकार रिप्लेस झाले आहेत. आता नवीन कॉमेडी कलाकारांसोबत कपिल शर्मा नवीन सीझन घेऊन आले आहेत. नव्या टीममध्ये कीकू शारदा, सिद्धार्थ सागर, गौरव दुबे, सुमोना चक्रवर्ती दिसणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या