28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमनोरंजन‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईतील ७० टक्के आकडे खोटे; कंगनाचा दावा

‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईतील ७० टक्के आकडे खोटे; कंगनाचा दावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा ‘ब्रह्मास्त्र’चित्रपटावर टीका केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईतील ७० टक्के आकडे खोटे असल्याची ‘ब्रह्मास्त्र’च्या बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीवर तिने प्रतिक्रिया दिली आहे. करण जोहरने शनिवारी ‘ब्रह्मास्त्र’ने जगभरात ७५ कोटींची कमाई केल्याची माहिती दिली. या माहितीवर कंगनाने आज रविवारी (ता. ११) इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून कमाईचे आकडे खोटे असल्याचे म्हटले.

कंगना राणावतने चित्रपट निर्मात्या-लेखिका एरे मृदुला कॅथर यांचे ब्रह्मास्त्रच्या ‘फेरफार आकृत्या’बद्दलचे ट्विट शेअर केले आहे. त्यांनी लिहिले, ‘काही व्यापार विश्लेषक #बह्मास्त्र बीओचे आकडे सांगत नाहीत कारण ते पूर्णपणे फेरफार केलेले आहेत. जे लोक बोगस बॉक्स ऑफिस आकड्यांबरोबर विनोद करतात त्यांना असे करण्यासाठी मोठी रक्कम दिली जाते.

डेटाच्या एवढ्या मोठ्या फेरफारला देखील भारतातील आतापर्यंतची सर्वांत मोठी हेराफेरी म्हणता येईल. ज्यामध्ये ६०-७० टक्क्यांहून अधिक बनावट आकडे आहेत. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर उत्तर देताना कंगना म्हणाली, व्वा ! ही एक खालची पातळी आहे, ७० टक्के. ‘ब्रह्मास्त्र’ने दोन दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण ७६ कोटींची कमाई केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रदर्शनाच्या दिवशी कंगनाने या चित्रपटाशी संबंधित असलेल्या सर्व लोकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या