33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home मनोरंजन अमिताभ बच्चन यांनी शेअर केला भगवान विठ्ठलाचा फोटो

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला भगवान विठ्ठलाचा फोटो

एकमत ऑनलाईन

मुंबईत : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आजकाल कोरोनाव्हायरसशी लढा देत आहेत. ते मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यापासून त्यांचे चाहते आणि जवळचे लोक ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त करत आहेत. त्याचवेळी अमिताभ बच्चन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत. आता अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी दुपारी विठ्ठल आणि रुक्मणी यांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि लिहिले की, ‘देवाच्या चरणी समर्पित’.

कोणत्या 6 प्रकारच्या लोकांपासून ठेवले आहे अंतर

यापूर्वी अमिताभ यांनी मराठी आणि हिंदी भाषेत एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘ मत्सर करणारा, तिरस्कार करणारा, संतापजनक, असंतोषजनक, सतत संशयी आणि अनोळखी व्यक्तींच्या आसपास राहणारा हे सहा प्रकारचे मनुष्य आहेत जे नेहमीच दु: खी असतात. त्यामुळे त्यांना शक्य तितके टाळावे ‘.

एक भावनिक कविता शेअर केली

यापूर्वीही अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक भावनिक कविता शेअर केली आहे. हिंदी आणि इंग्रजीमध्ये कविता लिहिताना अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केली होती.

Read More  त्या ‘कथित’ पतीला तिच्यासोबत क्वारंटाईन

शुभेच्छा ज्या पद्धतीने मिळत आहेत त्यामुळे ते भारावून गेले

अलीकडेच अमिताभ यांनी ट्विट केले होते- ‘तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छाच्या पावसाने प्रेमाची सर्व धरणे मोडली आहेत. माझ्या आयसोलेट राहण्याच्या वेळेचा अंधकार तुम्ही कसा प्रकाशित केला हे मी शब्दांत सांगू शकत नाही. यावेळी महानायकाच्या म्हटले आहे की, जरी ते प्रत्येकाचे वैयक्तिकरित्या आभार मानू शकत नाही, मात्र ते आणि त्याच्या कुटुंबासाठी प्रेम आणि शुभेच्छा ज्या पद्धतीने मिळत आहेत त्यामुळे ते भारावून गेले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या