28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमनोरंजनकॅनडातील रस्त्याला ‘ए. आर. रहमानचे’ नाव!

कॅनडातील रस्त्याला ‘ए. आर. रहमानचे’ नाव!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : तमाम भारतीयांसाठी गौरवास्पद असणारी बातमी म्हणजे ऑस्कर विजेता भारतीय संगीतकार ए आर रहमान यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.कॅनडातील एका रस्त्याला ए.आर.रहमानचे नाव दिले आहे.

मोझार्ट ऑफ मद्रास अशी ओळख असलेल्या रहमानच्या शिरपेचात यानिमित्तान आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या प्रथितयश संगीतकाराने भावूक होत कॅनडा सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी तो भावूक झाल्याचे दिसून आले आहे.

संगीत क्षेत्रामध्ये गौरवास्पद कामगिरी करणा-या रहमानचा सन्मान करण्यासाठी कॅनडातील रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी देखील २०१३ मध्ये परदेशातील एका शहरातील रस्त्याला रहमान (अल्लाह रखा रहमान) यांचे नाव देण्यात आले होते.

सा-या जगभर रहमान यांच्या संगीताचा चाहतावर्ग पसरला आहे. त्याने आपल्या संगीताने श्रोत्यांना वेड लावले आहे. मणिरत्नम यांच्या रोजा पासून सुरु झालेला त्याचा प्रवास अद्याप सुरु आहे. आपले संगीत हे इतर संगीतकारांहून वेगळे असावे या ध्येयाने प्रेरित झालेल्या रहमान यांच्या संगीताचे चाहते अमाप आहेत. एखाद्या चित्रपटाला रहमानचे संगीत असते तेव्हा प्रेक्षक आवर्जुन तो चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यास जातात. केवळ बॉलीवूडच नाहीतर हॉलीवूडच्या वेगवेगळ्या चित्रपटांना रहमानने संगीत दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या