21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeमनोरंजनआमिरखानचा ‘लालसिंह चड्ढा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आमिरखानचा ‘लालसिंह चड्ढा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेते आमीर खान त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमासाठी विदेशात असल्याची माहिती मिळते आहे. कोरोनाच्या संकटामुळे कायम एका ठिकाणी असलेल्या कलाकारांच्या संदर्भातील बातम्या आता येऊ लागल्या आहेत. आमिरखानचा ‘लालसिंह चड्ढा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे चिन्हे आहेत. या चित्रपटासाठी तो अत्यंत मेहनत घेत असून इतर हिट चिटपटानंतरही हाही तेवढाच दमदार असल्याचे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. बॉलिवूड आता हळू हळू पुर्ववत होत आहे असे दिसत आहे.तुर्की देशातील आमीरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमासाठी आमीरने याआधी कोलकाता, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांत शूटिंग केलं आहे. त्यानंतर आता तो परदेशातील शूटिंग शेडय़ूल पूर्ण करत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमा 1994 सालच्या रॉबर्ट जेमेकीस दिग्दर्शित ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूडपटाचा अधिकृत रिमेक आहे. ‘फॉरेस्ट गंप’मध्ये सुपरस्टार टॉम हॅक्स याने मुख्य भूमिका केली असून या सिनेमाला ‘ऑस्कर’सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘लाल सिंह चढ्ढा’मध्ये करिना कपूर हिची महत्त्वाकांक्षी भूमिका आहे. गेल्या वर्षी कोलकाता आणि चंदिगडमध्ये ‘लाल सिंह चड्ढा’ची टीम शूटिंग करताना दिसली होती. त्यानंतर आता आमीरने कोरोनामुळे तुर्कीचे शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय.

नोव्हाव्हॅक्स लसीच्या निष्कर्षाने उंचावल्या अपेक्षा

 

 

 

.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या