19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमनोरंजनआमिरने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला ‘लाल सिंग चढ्ढा’

आमिरने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला ‘लाल सिंग चढ्ढा’

एकमत ऑनलाईन

मुंबई : आमिरने त्याच्या चाहत्यांना एक वेगळेच सरप्राईज दिले आहे. ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित केला आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चढ्ढा’ला नेटक-यांनी ‘बॉयकॉट लाल सिंग चढ्ढा’ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आमिरला मोठ्या मन:स्तापाला सामोरे जावे लागले होते. वास्तविक नेटक-यांची, चाहत्यांनी अनेकदा माफी मागून देखील त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली होती. त्याचा परिणाम असा झाला की, लाल सिंग चढ्ढा फ्लॉप झाला. बॉक्स ऑफिसवर त्याने म्हणावी अशी कमाई काही केली नाही.

‘लाल सिंग चढ्ढा’च्या बाबत जेवढे बोलले गेले होते. त्याच्या कमाईच्या आकड्यांविषयी सांगितले गेले त्यातुलनेत त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. यावेळी आमिरला काही जणांनी हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित करणार का, असा प्रश्नही विचारला होता. यावेळी त्याने आपण किमान सहा ते सात महिन्यांनंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होते. मात्र आता आमिरने त्याच्या चाहत्यांना एक वेगळेच सरप्राईज दिले आहे. ते पाहून आमिरच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

आमिरने कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही अनाऊन्समेंट न करता त्याचा चर्चेतील ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीनंतर तो नेटफ्लिक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे चाहत्यांनी आणि नेटक-यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एवढ्या लवकर हा चित्रपट ओटीटीवर येईल असे कुणाला वाटले नव्हते. आमिर आणि करिनाने याविषयी कोणतेही प्रमोशन केले नव्हते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या