23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमनोरंजनआरती सिंहने घटवले १८ दिवसांत ५ किलो वजन!

आरती सिंहने घटवले १८ दिवसांत ५ किलो वजन!

एकमत ऑनलाईन

मुंबई : कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आणि सुपरस्टार गोविंदाची भाची अभिनेत्री आरती सिंहचा एक व्हीडीओ सध्या जोरदार चर्चेत आहे. या व्हीडीओने सर्वांनाच धक्का दिला आहे.

परंतु हा एक सुखद धक्का आहे असेच म्हणावे लागेल. अभिनेत्रीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वच आश्चर्यचकित आहेत. अभिनेत्रीने अवघ्या १८ दिवसांत तब्बल ५ किलो वजन कमी केले आहे. आरती सिंहने स्वत: एक व्हीडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आरती सिंहने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हीडीओ शेअर केला आहे. हा व्हीडीओ पाहून भल्या भल्यांनी तोंडात बोटे घातली आहेत. त्याचे कारणही तितकेच रंजक आहे. अभिनेत्रीने चक्क १८ दिवसांत ५ किलो वजन कमी केले आहे. शेअर केलेल्या या व्हीडीओमध्ये आरती जीममध्ये घाम गाळताना दिसून येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या