23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeमनोरंजनअभिषेक दुधैया यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच ‘भुज : दी प्राईड ऑफ इंडिया’१३...

अभिषेक दुधैया यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच ‘भुज : दी प्राईड ऑफ इंडिया’१३ ऑगस्टला प्रदर्शित

एकमत ऑनलाईन

अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, एमी विर्क, शरद केळकर, इहाना धिल्लंन, प्रणिता सुभाष यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका असलेला ‘भुज : दी प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी माध्यमावर १३ ऑगस्ट २०२१ रोजी प्रदर्शित झाला. टीसीरिज आणि अजय देवगण यांची संयुक्त प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, गिन्नी खानुजा, वजीर सिंह, बन्नी संघवी आणि अभिषेक दुधैया यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि सहदिग्दर्शन अभिषेक दुधैया यांनी केले आहे.

तत्पूर्वी त्यांनी गुजरातच्या अंजार, रापर आणि जामनगर येथे आपले शिक्षण पूर्ण केले. मग मुंबईत आल्यावर त्यांनी मुकुल एस. आनंद यांच्या ‘त्रिमूर्ती’, रमणकुमार यांचा ‘राजा भैया’,‘वाह वाह रामजी’,‘सरहद पार’ वगैरे चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. याच दरम्यान त्यांनी ‘तारा’ ,‘संसार’, ‘दीवार’, ‘एहसास’, ‘अग्निपथ’, ‘सिंदूर तेरे नाम का’,‘लाईफ का रिचार्ज’ या मालिकांना दिग्दर्शन दिले आहे. त्यानंतर आता दिग्दर्शक म्हणून त्यांच्या ‘भुज : दी प्राईड ऑफ इंडिया’ हा पहिलाच चित्रपट १९७१च्या युद्धाची ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारलेला आहे. या चित्रपटात अजय देवगण याने स्क्वाड्रन लीडर विजयकुमार कर्णिक यांची व्यक्तिरेखा साकारली आहे, जे त्यावेळी भुज एअरबेसचे प्रमुख होते.

याबाबत बोलताना अजय देवगण म्हणाला, ‘मी जेव्हा विंग कमांडर विजय कर्णिक यांना विचारले की त्यांनी ‘भुज : दी प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटाला मंजुरी का दिलीत? तेव्हा ते म्हणाले, दिग्दर्शक अभिषेक दुधैया माझ्याकडे या घटनेवर चित्रपट बनविणार असल्याचे सांगत आले तेव्हा त्यांनी या चित्रपटासाठी आपण खूप संशोधन केल्याचे म्हटले. विशेष म्हणजे त्यांची टीम माधापर येथील ५०-६० महिलांशी याबाबत बोलले आहेत. अभिषेक यांची आजीही रनवे बनविणार्‍या स्त्रियांमध्ये सामील होत्या. हे सगळे ऐकल्यावर मी या सिनेमासाठी माझी मंजुरी दिली.’ याच पार्श्वभूमीवर ‘भुज : दी प्राईड ऑफ इंडिया’ चित्रपटामुळे दिग्दर्शक अभिषेक दुधैया यांच्याशी केलेली बातचीत.

पहिलाच चित्रपट तुम्ही दिग्गज कलाकारांना घेऊन पूर्ण केलात. आता तो प्रदर्शितही झाला आहे. कसं वाटतंय?
– खूप चांगले वाटतेय. मोठ्या कलाकारांसोबत काम करायला मजा येते. सगळ्याच कलाकारांनी खूप सहकार्य केले. सर्वात जास्त सहकार्य अजय देवगण यांनी केले. कारण संपूर्ण चित्रपट त्यांच्यावरच बेतलेला होता. स्क्वाड्रन लीडर विजयकुमार कर्णिक हेच आमच्या चित्रपटाचे नायक आहेत. ही भूमिका अजय देवगणने खूपच सुरेख वठवली आहे.

या सिनेमाचा विषय काय आहे?
– भारत-पाकिस्तान युद्धात १९७१ साली गुजरातमधील भुजच्या विमानतळावरील धावपट्टी पाक सेनेने बॉम्बहल्ले करून उध्वस्त केला होता. त्यावेळी भुज विमानतळाचे प्रमुख आयएएफ स्क्वाड्रन लीडर विजयकुमार कर्णिक आणि त्यांच्या टीमने गुजरातच्या माधापर व त्याच्या आसपासच्या गावातील ३०० महिलांच्या मदतीने वायुसेनेच्या विमानतळाची पुन्हा निर्मिती केली होती. हेच सगळे आम्ही या चित्रपटात दाखवले आहे.

या विषयावर चित्रपट बनविण्याचा निर्णय कसा आणि का आला?
– या युद्धात लष्कर आणि सामान्य जनता यांनी भाग घेतला होता. ही त्या गावातल्या ३०० महिलांची शौर्यगाथा होती. त्यात माझी आजी लक्ष्मी मां परमार हीदेखील होती. मी लहान होतो तेव्हा ती मला नेहमी त्यावेळची कहाणी ऐकवायची. त्यामुळे हा विचार माझ्या मनात फीट बसला होता. पुढे यावर चित्रपट बनविण्याची माझ्या मनात योजना होतीच. त्यामुळेच त्या ठिकाणच्या असंख्य महिलांशी मी चर्चा केली. विजयकुमार कर्णिक यांच्याशीही बोललो. खूप संशोधन केल्यावर आता चित्रपट सुरू केला. आता तो प्रदर्शित झाला असून लोकांनाही तो आवडतोय.

या चित्रपटाव्यतिरिक्त तुम्ही दुसरा कुठला सिनेमा बनवत आहात?
– या चित्रपटानंतर आता मी शौर्यचक्र विजेते सरदार बाना सिंह यांच्यावर बायोपिक बनवणार आहे. या विषयावर सध्या काम सुरू आहे. लवकरच मी याबाबतही तुम्हाला सर्व काही सांगेन.

पाठलाग करुन सागवान जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या