मुंबई : लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल जिन्यांवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. जुबिनला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात जुबिनची कोपर फ्रॅक्चर झाली आहे. मात्र, बिल्डींगच्या पाय-यांवरून खाली उतरत असताना त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे.
जुबिन नौटियाल अलीकडच्या काळात ‘तू सामना आये’, ‘माणिके’ आणि ‘बना शराबी’ सारख्या लोकप्रिय ट्रेडिंग गाण्यांसाठी प्रसिद्धीच्या झोतात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झाल्यानंतर जुबिनच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उजव्या हाताचा वापर न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.