शक्य असेल तर घरी रहा सेफ रहा -अभिषेक बच्चन
मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चनला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतल्या नामांकित नानावटी रूग्णालयात अभिषेकवर उपचार सुरू होते. मात्र उपचारानंतर त्याला आता घरी सोडण्यात आलं आहे.
गेल्या 3 दिवसांपूर्वी अभिषेकला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. कोरोनाची लागण होताच त्याला नानावटी रूग्णालयात दाखल केलं गेलं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे दुसऱ्याच दिवशी महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
काल बच्चन कुटुंबातल्या ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं आहे. अमिताभ यांच्या पत्नी जया यांचा अहवाल सुदैवाने निगेटीव्ह आला आहे. काल बच्चन यांचा बंगला मुंबई महापालिकेकडून सॅनिटाईज करण्यात आला आहे. अभिषेक बच्चन याने ट्विट करत सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शक्य असेल तर घरी रहा सेफ रहा असं त्याने ट्विट करून म्हटलं आहे.
Read More ऐश्वर्या-आराध्या यांनाही कोरोनाची लागण