मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते अरविंद धनू यांचे निधन झाले.वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन झाले. २५ जुलै सोमवारी त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अरविंद धनू यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकलाकार आणि सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.अरविंद यांच्यावर माहीम येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे. अरविंद यांनी ‘लेक माझी लाडकी’, ‘क्राईम पेट्रोल’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘एक होता वाल्या’ या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते.
शेवटची मालिका
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे काय असतं’ ही अरविंद यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत अरविंद यांनी शालिनीच्या वडीलांची भूमिका साकारली होती.