36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमनोरंजनअभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

एकमत ऑनलाईन

ठाणे : ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज सकाळी दहा वाजता ठाण्यातील राहत्या घरी निधन झाले ते 68 वर्षांचे होते.अविनाश खर्शीकर जानेवारीपासून आजारी होते. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दीर्घकाळ आजारी असलेल्या अविनाश यांनी वयाच्या 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

एक चार्मिंग अभिनेता अशी त्यांची इमेज होती. 1978 मध्ये त्यांनी चित्रपसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यापूर्वी ते नाटकांतून काम करत होतेच. त्यांनी केलेले अनेक सिनेमे गाजले. यात जशास तसे, माझा नवरा तुझी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, चालू नवरा भोळी बायको, माफीचा साक्षीदार आदी अनेक चित्रपटांत काम केलं. शिवाय रंगभूमीशीही त्यांनी आपली नाळ जोडलेलीच ठेवली. यात सौजन्याची एैशीतैशी, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुज आहे तुजपाशी या नाटकांचा त्यात समावेश होतो. तुज आहे तुजपाशी हे नाटक तर विक्रमी म्हणायला हवं.

मराठी चित्रपट सृष्टीतील लाडका विनोदी कलाकार गमावला – अमित देशमुख
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता अविनाश खर्शीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील लाडका विनोदी कलाकार गमावला आहे, या शब्दात ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांना सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात, मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून स्मृतिशेष खर्शीकर यांची कारकीर्द गाजली. आपल्या सहज आणि निखळ अभिनयामुळे मराठी सिनेसृष्टीत नव्वदच्या दशकातील चाहता कलाकार म्हणून ते परिचित होते. अविनाश खर्शीकर यांनी १९७८ ला ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली.

तुझं आहे तुझ्यापाशी मधला ‘श्याम’ ही भूमिका त्याचबरोबर ‘वासूची सासू, झोपी गेलेला जागा झाला, सौजन्याची ऐशी तैशी, लफडा सदन, अपराध मीच केला ही नाटके विशेष गाजली. त्याचबरोबर आधार, आई थोर तुझे उपकार, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या सात्विक अभिनयाचा अमीट ठसा त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटविला.त्यांच्या निधनाने चाहत्यांना नव्वदच्या दशकातील सिनेमांचा काळ पुन्हा आठवला असून लाडक्या अभिनेत्याच्या निधनाने शोक व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या