23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeमनोरंजनअभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती बिघडली

अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती बिघडली

एकमत ऑनलाईन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची तब्येत रविवारी अचानक खालावली. त्यामुळे त्यांना येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अगोदरच गेल्या अनेक दिवसांपासून श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, रविवारी अचानक प्रकृती खालावल्याने रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या ते डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हिंदुजा रुग्णालयात जाऊन दिलीपकुमार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना गेल्या महिन्यातही हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हाही त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे सांगितले जात होते. त्यावेळी रुटीन चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले असल्याचे त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सांगितले होते. त्यामुळे सर्व चाचण्या झाल्यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाल्याने आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे दिलीपकुमार यांनी आपले दोन भाऊ गमावले आहेत. यामध्ये २१ ऑगस्टला असलम (८८ वर्ष) आणि २ सप्टेंबरला अहसान (९० वर्ष) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.

गुजरातमधील केवडीया देशातील प्रथम इलेक्ट्रिक वाहन शहर होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या