18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमनोरंजनअभिनेते घनश्याम नायक यांचे निधन

अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काका ही भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाची झुंज देत होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. घनश्याम नायक यांच्या निधनानंतर टेलिव्हिजन विश्वातील कलाकारांकडून सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त केले जात आहे.

‘तारक मेहता’मधील नट्टू काका ही त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. नट्टू काका म्हणजेच अभिनेते घनश्याम नायक यांना गेल्यावर्षी कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी या शोमधून ब्रेक घेतला होता. प्रेक्षकांना भरभरून हसवणा-या घनश्याम यांना करिअरच्या सुरुवातीला पैसे कमावण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता.

दिवसभर खूप मेहनत करून त्यांना अवघे तीन रुपये मिळायचे. करियरच्या अगदी सुरुवातीच्या काळात घनश्याम थिएटरमध्ये काम करायचे. यावेळी दिवसभर घाम गाळल्यानंतर त्यांना तीन रुपये मिळायचे. त्यानंतर त्यांनी सिनेमांमध्ये काम करणे सुरू केले. ही गोष्ट ६० ते ७० च्या दशकातील आहे. तीन दिवस शूटिंग केल्यानंतर त्यांना तेव्हा ९० रुपये मिळायचे, असे घनश्याम यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर मात्र अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम मिळू लागल्यानंतर दिवस बदलले.

घनश्याम नायक ‘तारक मेहता’ या मालिकेत वयाच्या ७७ व्या वर्षापर्यंत काम करत होते. मात्र कन्सरवर उपचार सुरु असल्याने त्यांनी हा शो सोडला. इनमें ‘बेटा’, ‘लाडला’, ‘क्रांतिवीर’, ‘बरसात’, ‘घातक’, ‘चाइना गेट’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लज्जा’, ‘तेरे नाम’, ‘खाकी’ या सारख्या अनेक सिनेमांमध्ये घनश्याम नायक यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या