22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमनोरंजनअभिनेता किशोर दासचे निधन

अभिनेता किशोर दासचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : आसाम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किशोर दासचे निधन झाले आहे. किशोर दासने वयाच्या ३० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चेन्नईमधील एका रुग्णालयात किशोर हा कॅन्सरवर उपचार घेत होता. काही दिवसांपूर्वी किशोरने रुग्णालयातील एक फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करून किशोरने त्याला जाणवत असलेल्या समस्यांबाबत सांगितले होते.

किशोरने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले होते की त्याचा किमोथेरपीचा चौथा टप्पा सुरू आहे. पोस्टमध्ये त्याने लिहिले होते, ‘जे तुम्हाला मारत नाही ते तुम्हाला मजबूत बनवते.

सध्या किमोथेरपीचा चौथा टप्पा सुरू आहे. तुम्हाला वाटतं तेवढं हे सोपं नाही. या दिवसांत मला काही समस्या जाणवत आहेत. मला उल्टी होणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे हे साईड इफेक्ट्स जाणवत आहेत. मी डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषध देखील घेऊ शकत नाही. मी यामधून लवकर बरे होण्याची आशा व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करा.’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या