26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनअभिनेता प्रदीप मुखर्जी यांचे निधन

अभिनेता प्रदीप मुखर्जी यांचे निधन

एकमत ऑनलाईन

कोलकाता : मनोरंजन विश्वातून सोमवारी संध्याकाळी दुखद बातमी समोर आली आहे. बंगाली चित्रपट विश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेता प्रदीप मुखर्जी यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याने आज पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील एका दवाखान्यात शेवटचा श्वास घेतला. प्रदीप हे ७६ वर्षांचे असताना जगाचा निरोप घेतला आहे.

अभिनेत्याला सत्यजित रे यांच्या जन अरण्यमधील भूमिकेमुळे ओळख मिळाली होती. या व्यतिरिक्त त्यांनी बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता अर्जुन रामपाल यांचा चित्रपट कहानी २ : दुर्गा रानी सिंहमध्ये डॉ मैतीची महत्त्वाची भूमिका केली होती. चित्रपटातील आपल्या या भूमिकेसाठी प्रदीप मुखर्जी यांनी खूप वाह वाह मिळवली होती.

प्रदीप मुखर्जी यांना २२ ऑगस्ट रोजी फुफ्फुसाचा संसर्ग झाल्यानंतर दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांची रविवारपासून तब्येत बिघडत चालली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अभिनेत्याच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे. गेल्या दोन वर्षांत दोनदा ते कोरोनानेही संक्रमित झाले होते. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४६ रोजी झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या