30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home मनोरंजन अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन

अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन

एकमत ऑनलाईन

पुणे : झपाटलेला चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. कडकोळ यांनी मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले होते. त्यांनी अश्रूंची झाली फुले नाटकात धर्माप्पा ही भूमिका साकारली होती.

ही भूमिका त्यावेळी विशेष गाजली होती. त्यांनी ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘गौरी’, ‘सखी’, ‘कुठे शोधू मी तिला’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर ‘छोडो कल की बात’ या हिंदी चित्रपटात देखील भूमिका साकारली होती. बालगंधर्व परिवारतर्फे राघवेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदानकेला होता. कृष्णधवल चित्रपटांपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. रंगभूमीवर काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर अशा दिग्गज कलावंतांसोबत काम केले. ‘झपाटलेला’ या चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार या भुमिकेने ते रसिकांच्या मनात त्यांच्या अभिनयाचा पक्का ठसा उमटला होती.

राफेलमुळे चीनच्या तंबूत घबराट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या