26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमनोरंजनअभिनेता सलमान खान याची चौकशी केली जाण्याची शक्यता

अभिनेता सलमान खान याची चौकशी केली जाण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येमागे कट-कारस्थान असल्याचे सांगत चाहत्यांकडून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास सुरू आहे. यामध्ये त्याच्या एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसह अनेक त्याचे सहकलाकार, मित्र आणि नातेवाईकांचा समावेश आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

सुशांत सिंह प्रकरणात आता अभिनेता सलमान खान याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणात उद्या सलमान खान याला समन्स जारी केला जाऊ शकतो. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अभिनेता सलमान खान याची माजी व्यवस्थापक रेश्मा शेट्टी हिचा जबाब नोंदविण्यात आला होता.

आता सलमान खान याचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान आपल्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत सुशांत सिंह राजपूत याला घेऊन एक चित्रपटाची निर्मिती करणार होता. मात्र काही कारणाने सुशांत राजूपतच्या विवादानंतर सलमान खानने हा चित्रपट करणार नसल्याचे कळते.

Read More  नियमाचं उल्लंघन : महिला पोलीस कर्मचाऱ्याची आमदारावर कारवाई

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या