23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeमनोरंजनअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराने निधन झाले. वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहेत.

सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. ‘बालिका वधू’ या मालिकेतून त्याने अनेकांची मने जिंकली होती. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती.

त्याने रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस १३ मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता. १२ डिसेंबर १९८० रोजी सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८ मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती.

लहान मुलांसाठी चौथ्या लस चाचणीला परवानगी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या