31.8 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमनोरंजनअभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन

अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन

एकमत ऑनलाईन

कोलकाता : नामवंत बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे कोलकातामधील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. सौमित्र चॅटर्जी यांचे वय ८५ वर्ष होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. सत्यजीत राय यांच्या ‘अपूर संसार’ या चित्रपटाद्वारे सौमित्र चॅटर्जी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

जेष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांची कोरोना चाचणी ६ ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले होते पण त्यांची तब्येत खालावली होती. बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांच्यावर डॉक्टरांकडून सातत्याने उपचार सुरु होते.

मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती. अखेर आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या रक्तातील यूरिय आणि सोडियमचे प्राण वाढले होते. कोरोना संसर्ग झाल्यापासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. सौमित्र चॅटर्जी यांनी प्रामुख्याने बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं वेगळ स्थान होते. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९३५ ला कोलकातामध्ये झाला होता. अभिनयाचा वारसा सौमित्र चॅटर्जी यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता.

मंदिरे उघडणार; पंढरीत आंनदोत्सव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
185FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या