33.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home मनोरंजन अभिनेता सुबोध भावे यांच्यासह पत्नी आणि मुलालाही करोनाची लागण

अभिनेता सुबोध भावे यांच्यासह पत्नी आणि मुलालाही करोनाची लागण

एकमत ऑनलाईन

मुंबई -राज्यभरात करोना बाधितांची संख्या वाढतच आहे. मराठी सिनेसृष्टीतही करोनाने शिरकाव केला आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांना करोना ची लागण झाली आहे. सुबोध यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलालाही करोनाची लागण झाली आहे. यासंर्भातील माहिती सुबोध भावे यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे.

सुबोध भावे म्हणाले कि, मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही करोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले असून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरू आहे. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि घरी सुरक्षित रहा, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये सुबोध भावे सोशल मीडियावर लहान मुलांसाठी कथा-गोष्टी ऑनलाइन स्वरुपात सांगत आहे. या कथा फार कमी वेळेतच लहान मुलांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत.

“गणपती बाप्पा मोरया”
दिखाव्यापलीकडची बाप्पावरची श्रद्धा आणि त्याच्या वरचं प्रेम कायम असुदे,
न मागताही तू इतकं काही देतोस,
आता तू दिलेल्या आयुष्याला उत्तम पद्धतीने आणि आनंदाने जगायची बुद्धि आम्हाला दे,
सूर निरागस दे!

सुब्रमण्यम स्वामींची मोदींना परीक्षा दिवाळीनंतर घेण्याची विनंती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या