23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमनोरंजनअभिनेत्री अनुष्का शर्माने दिलखुलास हास्याने जिंकली चाहत्यांची मने

अभिनेत्री अनुष्का शर्माने दिलखुलास हास्याने जिंकली चाहत्यांची मने

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा अशा कलाकारांपैकी एक आहे ज्यांना शो ऑफ करणे फारसे आवडत नाही, तसेच अतिशय साधेपणाने जगणे आवडते. तिने सोशल मीडियावर आपले काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये अनुष्का दिलखुलासपणे हसताना दिसत आहे. तिचा हसरा चेहरा पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.

तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.

अनुष्का शर्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एका पार्कमध्ये बेंचवर बसलेली असून पेस्टल कलरचा टॉप एंड शॉर्टस् असा आऊटफिट तिने परिधान केला आहे. यासोबतच तिने हातात मॅचिंग घड्याळ आणि डोळ्यांना सनग्लासेस लावले आहेत. अनुष्काचा एकूणच लूक चाहत्यांची मने जिंकत आहे.

अनुष्का शर्माच्या या लेटेस्ट फोटोवर केवळ तिच्या चाहत्यांनीच कमेंट केली नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिच्यावर कौतुकाच्या कमेंट केल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या