21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमनोरंजनअभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचे नाव आरोपी म्हणून सांगण्तयात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश हा गुन्हेगार असल्याची जॅकलिन फर्नांडिसला आधीच माहिती होती, असा ईडीचा दावा आहे. सुकेश हा खंडणीखोर आहे हेही अभिनेत्रीला माहीत होते. यामुळेच ईडीने जॅकलीनवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, जॅकलिनला अद्याप अटक झालेली नाही. कारण आतापर्यंत न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतली नाही. असं असलं तरी अभिनेत्रीला देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

नक्की काय आहे प्रकरण?

सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्याचे समोर आले. त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाई करत त्याची ७ कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली होती. सुकेश चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणीने सुकेशला जॅकलीनला भेटायला लावल्याचेही आरोपपत्रात उघड झाले आहे. सुकेशने पिंकीच्या मदतीने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू आणि रोख रक्कम दिली होती.

जॅकलीनवर आरोप

सुकेश चंद्रशेखरने डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान जॅकलिन फर्नांडिसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिनेत्रीने त्याच्या फोनला प्रतिसाद दिला नाही, असेही ईडीच्या चार्टशीटने उघड केले. दरम्यान, अभिनेत्रीने आरोप केला आहे की सरकारी कार्यालयातील कोणीतरी तिला संपर्क केला आणि तिला सुकेशशी संपर्क करायला सांगितला, ज्याला जॅकलीन शेखर रत्न वेला नावाने ओळखत होती.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या