24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमनोरंजनअभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सर

अभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सर

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चंदिगडच्या भाजप खासदार किरण खेर यांना मल्­टीपल मायलोमा असल्याचे निदान झाले आहे. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. याबाबतची माहिती किरण खेर यांचे पती दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत दिली आहे. अनुपम खेर यांनी गुरुवारी सकाळी एक भावूक ट्विट करत किरण खेर यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की ‘मी ही माहिती यासाठी शेअर करत आहे जेणेकरून अफवा पसरू नयेत.

किरण खेर यांना मल्टीपल मायलोमाचे निदान झाले आहे. हा एक ब्लड कॅन्सरचा प्रकार आहे. किरण यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या यातून पहिल्यापेक्षा अधिक मजबूत होऊन बाहेर पडतील, असा आम्हाला विश्वास आहे. त्या नेहमीच लढवय्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. किरण जे काही करतात ते मनापासून करतात त्यामुळे लोक त्यांच्यावर भरभरून खूप प्रेम करतात. त्यासाठी तुमचे प्रेम प्रार्थनेच्या रूपातून असेच पाठवत रहा. त्यांची प्रकृती आता ठीक असून त्यात सुधारणा होत आहे.

तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार.. अनुपम आणि सिकंदर. ६८ वर्षीय किरण यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असल्याचे समजते. किरण खेर यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यात त्या निवडून आल्या. २०१९ मध्येही त्यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी १९८३ मध्ये पंजाबी चित्रपट ‘आसरा प्यार दा’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत.

बेडसाठी आंदोलन करणा-या रुग्णाचा तडफडून मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या