24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमनोरंजनअभिनेत्री क्षिती जोग दिसणार हिंदी चित्रपटात

अभिनेत्री क्षिती जोग दिसणार हिंदी चित्रपटात

एकमत ऑनलाईन

मुंबई : धर्मा प्रोडक्शनच्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ बहुचर्चित सिनेमात आता मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग दिसणार आहे. मराठी अभिनेत्रींमध्ये एक दिग्गज नाव म्हणजे क्षिती जोग. क्षितीने आजपर्यंत अनेक भूमिका तिच्या अभिनयाने गाजवल्या आहेत. ‘झिम्मा’ या चित्रपटातील तिची भूमिका सर्वांनाच भावली. क्षितीने केवळ मराठी मालिका, चित्रपट केले नाहीत तर तिने हिंदीतही मजल मारली. याआधी तिने तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेला ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट केला होता.

दरम्यान क्षिती जोग आता बॉलिवूडच्या एका बिगबजेट सिनेमात दिसणार आहे. यासंदर्भात नुकताच एक व्हीडीओ क्षितीने शेअर केला आहे. धर्मा प्रोडक्शनच्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ बहुचर्चित सिनेमात ती दिसणार आहे. या सिनेमाचं शूट नुकतंच संपलं असून एक जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीचा एक व्हीडीओ क्षितीने शेअर केला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहेत. या व्हीडीओमध्ये रणवीर क्षितीला मिठी मारताना दिसत आहे. स्वत: रणवीरने हा व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यासह धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन हे दिग्गज कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. १० फेब्रुवारी २०२३ रोजी हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाल्याने प्रेक्षकांना आता ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या