28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमनोरंजनअभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ

अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणी आता बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसनंतर आता नोरा फतेहीची चौकशी होणार आहे. आज १५ सप्टेंबर रोजी   तिला दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधीदेखील ईडीकडून नोराची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल सहा तास चौकशी करून नोराचा जबाब नोंदवण्यात आला होता.

ईडीच्या दिल्ली येथील कार्यालयाकडून नोरा फतेहीला नोटीस मिळाल्याने ती आज ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. ही चौकशी मनी लाँड्रिंग प्रकरणी होणार आहे. सुकेश चंद्रशेखरने केलेल्या २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोराचे देखील नाव आले आहे. ईडीकडून होणारी नोराची ही दुसरी चौकशी असणार आहे.

सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर, सारा अली खान आणि जान्हवी कपूरसारख्या काही अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. सुकेशने या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या, काही अभिनेत्रींनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला तर काहींनी नाकारल्या होत्या. दरम्यान जॅकलीन त्याच्या बरीच जवळ आली. त्यामुळे या प्रकरणात तिची कसून चौकशी होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या