22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमनोरंजनअभिनेत्री रेखा यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी -किशोरी पेडणेकर

अभिनेत्री रेखा यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी -किशोरी पेडणेकर

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री रेखा यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. रेखा यांचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही या ज्येष्ठ अभिनेत्रीने स्वतःची चाचणी करून घेतली नव्हती.

अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी आली, त्याच दिवशी आणखी एका बॉलिवूड सेलेब्रिटीच्या घरापर्यंत कोरोना पोहोचल्याचं वृत्त आलं होतं. अभिनेत्री रेखा यांचा बंगला मुंबई महापालिकेने सील केला, कारण त्यांच्या ड्रायव्हरची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर रेखा यांनी आपली कोरोना चाचणी करायची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं होतं. “गेल्या कित्येक दिवसात आपण घराबाहेर पाऊल ठेवलेलं नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका नाही,” असं रेखाने सांगितल्याचं वृत्त होतं.

रेखा यांना कोरोनाची कुठलीही लक्षणं दिसत नसली….

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मात्र रेखा यांनी चाचणी करून घ्यावी, असं आवाहन केलं आहे. त्यांच्या चालकाला कोरोना झाल्याला सात दिवस झाले. रेखा यांना कोरोनाची कुठलीही लक्षणं दिसत नसली, तरी त्यांनी चाचणी केली पाहिजे, असं पेडणेकर म्हणाल्या.

त्यांच्या प्रकृतीची चिंता त्यांना वाटते

“रेखा यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या प्रकृतीची चिंता त्यांना वाटते. त्यामुळे BMC कडूनच करावी असं नाही, त्यांना वाटलं तर खासगी लॅबमधूनही त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. त्यांची तब्येत ठणठणीत राहावी, अशीच आमची इच्छा आहे”, असं पेडणेकर म्हणाल्या.

कर्मचाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही

रेखा यांच्या स्टाफपैकी एकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या बंगल्याचं निर्जंतुकीकरण करायला महापालिकेचे कर्मचारी गेल्या आठवड्यात गेले होते. पण त्यानंतर BMC च्या कर्मचाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही, असंही मुंबईच्या महापौरांनीबोलताना नमूद केलं.

Read More  तारतम्याने निर्णय घ्या; दडपणाला बळी पडू नका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या