25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमनोरंजनअभिनेत्री तेजश्री प्रधान करणार ‘नेत्रदान’

अभिनेत्री तेजश्री प्रधान करणार ‘नेत्रदान’

एकमत ऑनलाईन

मुंबई : तेजश्री प्रधान ही मराठी चित्रपटजगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौेंदर्याने तिने चित्रपटजगतात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या सोशल मीडियावर तेजश्रीच्या एका निर्णयाने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

अलीकडेच तेजश्री नेत्रदान करणार असल्याची माहिती सोशल मीडियावरून समोर आली होती. यामुळेच नेटकरी तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

तेजश्री प्रधान ही मराठी चित्रपटजगत आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून अभिनेत्रीने घराघरांत लोकप्रियता मिळवली आहे. तेजश्रीचे पाणीदार, बोलके डोळे चाहत्यांना नेहमीच प्रेमात पाडत असतात. हेच सुंदर डोळे अभिनेत्रीने दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक सामाजिक कार्यांमध्ये आवडीने सहभागी होणा-या तेजश्रीने मी नेत्रदान करतेय तुम्हीही करा असे आवाहन करत ही बातमी दिली आहे. तेजश्री सक्षम या सामाजिक संस्थेसोबत जोडली गेली आहे.

अभिनेत्रीने घेतलेल्या या निर्णयाचे नेटक-यांनी जोरदार स्वागत केले असून तिच्यावर सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या तेजश्रीने अनेक गाजलेल्या मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या