मुंबई : ‘चंद्रमुखी’ चित्रपट रिलीज झाला आणि आदिनाथ कोठारे जास्त चर्चेत आला. ‘चंद्रमुखी’चा दौलतराव देशमाने लोकांना भावला. पण त्याच वेळी आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कोठारे यांच्यात बिनसलं, दोघं वेगळे होणार अशी एक वेगळीच चर्चा सुरू झाली होती. सोशल मीडियावर तर या गोष्टींना ऊतच आला होता.
यावर आदिनाथ म्हणाला, ‘अशा बातम्या आम्ही वाचतो आणि त्यावर खूप हसतो. आम्ही दोघंही बिझी आहोत.’ ऊर्मिलाचीही ‘तुझेच गीत मी गात आहे’ ही सीरियल सुरू आहे. आदिनाथ पुढे म्हणाला, ‘आम्ही खरंच बिझी असतो. अशा गोष्टींसाठी वेळ नाही. पण जेव्हा या बातम्या पाहतो, तेव्हा खूप हसतो.’