23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमनोरंजनअदनान सामीचा सोशल मीडियाला ‘अलविदा’?

अदनान सामीचा सोशल मीडियाला ‘अलविदा’?

एकमत ऑनलाईन

मुंबई : पद्मश्री विजेता लोकप्रिय गायक अदनान सामी याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या असून, ‘अलविदा’ म्हणत एक व्हीडीओ शेअर केला आहे. त्याची ‘अलविदा’ ही पोस्ट पाहून चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत. या पोस्टमुळे अदनान सामी याने इन्स्टाग्रामला अलविदा केला असावा, अशी अटकळ बांधली जात आहे

. मात्र, यावर अदनान याने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. अदनानने त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट हटवल्या असल्या तरी ट्विटरवर मात्र सगळ्या पोस्ट दिसत आहेत.

नुकताच अदनानने वजन कमी करून आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याची फॅट टू फिट जर्नी पाहून चाहते देखील भारावून गेले होते. स्वत: अदनान सामीने त्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. मात्र, आता त्या फोटोंसह सगळ्याच पोस्ट गायब झाल्याने चाहते नाराज झाले आहेत.

एकीकडे अदनान सामीने इन्स्टाग्रामला अलविदा केलाय, असे म्हटले जात आहे, तर दुसरीकडे त्याचे काही चाहते म्हणत आहेत की, हा केवळ प्रमोशन फंडा असून, त्याचे आगामी गाणे ‘अलविदा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गायक अदनान सामी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय होता. तो अनेकदा आपले फोटो आणि व्हीडीओ शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहत होता. मात्र, आता त्याने सगळ्या पोस्ट हटवून केवळ ‘अलविदा’ म्हटल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या