31.7 C
Latur
Friday, March 31, 2023
Homeमनोरंजनअलका कुबलच्या पायलट मुलीनंतर दुसरी मुलगी झाली डॉक्टर

अलका कुबलच्या पायलट मुलीनंतर दुसरी मुलगी झाली डॉक्टर

एकमत ऑनलाईन

मुंबई : अलका कुबल मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री. अलका कुबल यांचे जुने नवे सिनेमे आजही आवडीने पाहिले जातात. अलका कुबल या व्यावसायीकदृष्ट्या यशस्वी अभिनेत्री आहे. पण व्ययक्तीक आयुष्यात सुद्धा अलका कुबल यांचं आयुष्य सुख समाधानाचे आहे. अलका कुबल यांच्या आयुष्यात नुकतीच एक आनंदाची गोष्ट घडली आहे.

अलका कुणाल यांची थोरली मुलगी ईशानी पायलट आहे. हे सर्वांना माहीतच आहे. आता अलका कुबल यांच्या धाकट्या मुलीने सुद्धा करियरमध्ये यशस्वी भरारी मारली आहे. अलका कुबल यांची धाकटी मुलगी कस्तुरी आता डॉक्टर झाली आहे. अलका ताईंनी कस्तुरीचा खास फोटो सोशल मीडियावर शेयर करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे.

कस्तुरीचा पदवीदान समारंभातील खास फोटो अलका ताईंनी शेयर केला. अलका ताई या फोटोला कॅप्शन लिहितात, कस्तुरीने पहिल्याच प्रयत्नात एफएमजीई परवाना परीक्षा यशस्वीपणे पास केली. आज पासून डॉ. कस्तुरी आठल्ये म्हणून ती ओळखली जाईल.आम्हाला तुझा अभिमान आहे. खूप शुभेच्छा अशी पोस्ट अलका कुबल यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या