24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजन‘धाकड’ फ्लॉप झाल्यानंतर मूळ गावी पोहोचली कंगना

‘धाकड’ फ्लॉप झाल्यानंतर मूळ गावी पोहोचली कंगना

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतचा ‘धाकड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉपच्या यादीत जमा झाला आहे. चित्रपट अपयशी ठरल्यानंतर कंगना मुंबईहून तिच्या मूळ गावी हिमाचल प्रदेशात गेली आहे. येथे मनालीमध्ये ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतेय. नुकताच तिने कुटुंबासोबत पिकनिकचा आनंद घेतला. कंगनाने या पिकनिकचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

पिकनिकचे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, माझ्या आवडत्या ठिकाणी माझ्या कुटुंबासोबत ब्रेक डे खूप आवश्यक आहे… आणि हवामानही खूप छान आहे. हा खूप सुंदर दिवस आहे.

कंगनाने नुकतेच तिच्या मूळ गावी म्हणजेच हिमाचल प्रदेशातील मनाली येथे नवीन घर घेतले आहे. गुरुवारी तिने आपल्या नवीन घराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. डोंगरांच्या मधोमध असलेल्या तिच्या आलिशान घराची आतील छायाचित्रे शेअर करताना, हे घर पहाडी स्टाईलमध्ये रिव्हर स्टोनपासून बांधले असल्याचे कंगनाने सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या