24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजनबायकोच्या विरोधात खटला जिंकल्याने मेजवानीवर ४८ लाख रुपयांचा खर्च

बायकोच्या विरोधात खटला जिंकल्याने मेजवानीवर ४८ लाख रुपयांचा खर्च

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सा-या जगाने हॉलिवूडचा अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पत्नी एंबर हर्ड यांच्या घटस्फोटाचा खटला सोशल मीडियावर पाहिला. त्यात त्यांनी एकमेकांवर केलेले आरोप भलतेच धक्कादायक होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यातील वाद सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखेर तो खटला पायरेटस ऑफ कॅरेबियनच्या अभिनेत्याने जिंकला आहे. त्याने तो आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

खटला जिंकल्यानंतर त्याने एका शानदार मेजवानीचे आयोजन केले होते, त्यासाठी त्याने तब्बल ४८ लाख रुपयांचा खर्च केल्याची बातमी समोर आली आहे. जॉनीला हर्डकडून १०.३५ मिलियन रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे.

नवरा-बायकोच्या भांडणाची प्रसिद्धी सोशल मीडियावर होणे ही काही आता नवीन गोष्ट राहिली नाही. मात्र आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या घटस्फोटाचा खटला असेल तर त्याची चर्चा होणारच. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून जॉनी डेप आणि हर्डच्या केसची चर्चा सुरू होती. त्यातून वेगवेगळे आरोप समोर आले होते. ते आरोप कमालीचे धक्कादायक होते. अखेर त्या खटल्यातून जॉनीच्या पत्नीनं त्याच्यावर मानसिक अत्याचार केल्याचे समोर आले होते. तिने त्याची गेल्या काही वर्षांपासून बदनामी करण्यास सुरुवात केली होती.

त्याविरोधात जॉनीने कोर्टामध्ये धाव घेतली होती. जेव्हा जॉनीने खटला दाखल केला तेव्हा त्यावरून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्याने तो खटला जिंकला. त्यानंतर त्याने वाराणसी नावाच्या एका हॉटेलमध्ये मेजवानी दिली.

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे असणा-या एका भारतीय हॉटेलमध्ये मित्रांसमवेत पार्टी केली. त्यासाठी त्याने ६२ हजार डॉलर खर्च केले. त्याची रक्कम ही ४८.२२ लाख रुपये एवढी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉनीने डिनरचे आयोजन केले होते. ती एक कॉकटेल पार्टी होती. डेपने त्याचा संगीतकार मित्र जेफ बेफ आणि इतर २० सहका-यांसोबत मोठी पार्टी केल्याचे दिसून आले आहे. त्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या